दिल्ली : कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांची अवस्था दयनीय झाली आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम वाहतुकीवर होताना दिसत आहे. दाट धुक्यामुळे अनेक उड्डाणे आणि गाड्या उशिराने धावत आहेत तर अनेक उड्डाणांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.
रविवारीही दाट धुक्यामुळे 22 गाड्या उशिराने तर 7 उड्डाणे वळवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी 6 फ्लाइट जयपूरच्या दिशेने तर एक फ्लाइट मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली आहे. ही सर्व उड्डाणे पहाटे 4.30 ते 7.30 दरम्यान वळवण्यात आली.