24.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeपरभणीआ. काळेंनी प्रकृती आणि संस्कृती जपली : प्रा. भालेराव

आ. काळेंनी प्रकृती आणि संस्कृती जपली : प्रा. भालेराव

परभणी : स्व.वसंतराव काळे यांचे साहित्यांवर नितांत प्रेम होते. त्यांच्यानंतर आ. विक्रम काळे यांनी दरवर्षी साहित्य संमेलन आयोजनाच्या माध्यमातून वडिलांची स्मृती कशी जपावी हे दाखवून दिले. आ. काळे यांनी प्रकृति आणि संस्कृती उत्तम जपली असल्याचे प्रतिपादन कविवर्य प्रा. इंद्रजीत भालेराव यांनी केले.

शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृहात राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने मराठवाडा विभाग छत्रपती संभाजीनगरचे शिक्षक आ. विक्रम काळे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी केशव अन्ना दुधाटे तर सत्कार मूर्ती म्हणून आ.विक्रम काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ विधिज्ञ अशोक सोनी, कविवर्य प्रा.इंद्रजीत भालेराव, शिक्षणाधिकारी प्रा.विठ्ठल भुसारे, माध्य. व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे सदस्या शितल सोनटक्के, प्राचार्य बाळासाहेब जाधव, वेतन पथक अधीक्षक भातलवंडे, इंजि.नारायण चौधरी, डॉ. विजय बोंडे, विशाल सोनुने, प्रा.मखदूम, मा.मा.सुर्वे, मंगल पांडे, मुख्याध्यापक संघाचे डी. एल.उमाटे, बी.एम.भांगे गणेश शिंदे, डॉ. जोगदंड, सुनील गायकवाड, राजाभाऊ सरडे आदिंची उपस्थिती होती. याप्रसंगी राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने आ. विक्रम काळे यांना विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा, फेटा, शाल, हार घालून सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना प्रा. भालेराव म्हणाले की, परिस्थिती कशीही असो नेहमीच सत्याच्या बाजूने उभे राहिले की मग मागे फिरून पाहायची गरज पडत नाही. जे तुम्ही लिहाल तेच वाचाल. तुमचा विचार जितका मोठा मोठा होत जाईल तितकच तुमचे कर्तृत्व वाढत जाईल असे सांगितले. यावेळी शिक्षकांची मोफत सीबीसी व आरबीएस तपासणी जिजाऊ पॅथॉलॉजीचे डॉ. विजय बोंडे यांच्यावतीने करण्यात आली. यावेळी क्रीडा संस्कृती फाउंडेशन नाशिकच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श क्रीड़ा शिक्षक पुरस्कार मिळालेल्या विजय गारकर, तुळशीराम शेळके, बाळासाहेब राखे, प्रकाश हरगावकर, किशोर ढोके, महेश काळदाते, सज्जन जैस्वाल, शिवाजी तळेकर, शेख अदिचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक पी.आर.जाधव यांनी केले.

सूत्रसंचालन प्रा. जयंत बोबडे तर आभार रामप्रसाद अवचार यांनी मानले. यशस्वीतेसाठी रणजीत काकड़े, श्रीकृष्ण शिंदे, देवा महाजन, बालाजी सुर्वे, राम रेंगे, पांडुरंग वाघ, विशाल जाधव, राजू जंपनगिरे, विष्णु मोपकर, मोतीराम शिंदे, गुलाब कदम, मो.बशीर, सदाशिव होगे, शांतिलिंग काळे, गोपाळ भुसारे, राष्ट्रवादी शिक्षक संघ जिल्हा, तालुका सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

शिक्षकांचे प्रश्न सोडविणे माझे कामच- आ.विक्रम काळे
शिक्षकच केंद्रबिंदू मानून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. शिक्षक, प्राध्यापक यांचे अत्यंत जटिल प्रश्न सोडविन्यात यश आले. सभागृहात मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षण प्रश्न मंडला. जूनी पेंशनसाठी लढ़ा सुरु आहे असल्याचे आ. विक्रम काळे यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR