21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयआमच्याकडे येऊन शारिरीक भूक भागवा, पण बलात्कार करू नका

आमच्याकडे येऊन शारिरीक भूक भागवा, पण बलात्कार करू नका

कोलकाता : कोलकाता या ठिकाणी ९ ऑगस्टला झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेने सगळा देश हादरला. यानंतर पीडितेला न्याय मिळावा म्हणून आंदोलन करण्यात आले. आता याच कोलकाता या ठिकाणी असलेल्या सोनागाछी या ठिकाणी शरीर विक्री करणा-या महिलांनी आमच्याकडे आपली शारीरिक भूक भागवा पण बलात्कार करू नहा असे आवाहन केले आहे. या प्रकरणात आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली आहे. त्याची लाय डिटेक्टर टेस्ट आणि पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली.

९ ऑगस्टला सकाळी एक महिला डॉक्टर आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत आढळली. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा तिच्यावर बलात्कार झाला असल्याची बाब समोर आली. तिच्या शरीरावर आणि गुप्तांगावर अनेक जखमा होत्या. तिच्या डोळ्यांमधूनही रक्त वाहात होतं अशीही माहिती समोर आली. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या मुलीला न्याय दिला पाहिजे अशी मागणी होते आहे.

अत्यंत क्रूर पद्धतीने तिची हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात आरोपी संजय रॉयला पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर सोनागाछी येथील देहविक्री करणा-या महिलांनी एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. सोनागाछी हा कोलकाता येथील रेड लाईट एरिया आहे. या ठिकाणी देहविक्री करणा-या महिलांनी कोलकाता बलात्कार आणि हत्याकांडाचा निषेध केला आहे. त्या महिलांनी या घटनेविरोधात निदर्शने केली आणि त्यांना या घटनेबाबत काय वाटते ते माध्यमांना सांगितले.

काय म्हटले आहे सोनागाछीतल्या महिलांनी?
देहविक्री करणारी महिला म्हणाली, ‘‘तुमच्या शरीराची भूक इतकी उफाळून आली असेल तर खुशाल सोनागाछीला या, तुमची भूक भागवा. पण कृपा करुन कुठल्याही मुलीचे किंवा महिलेचे शोषण करु नका तसेच कुणावरही बलात्कार करु नका. देहविक्री करणा-या इतर महिलांनीही अशाच प्रकारे मतप्रदर्शन केले आहे. ९ ऑगस्टच्या दिवशी ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह आर. जी. कर रुग्णालयात आढळला होता. या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या पीडितेच्या शवविच्छेदनानंतर तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर देशभरात संतापाची तीव्र लाट उसळली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR