सोलापूर: फेब्रुवारी- रेडीमेड गारमेंट ही मोठी इंडस्ट्री आहे. मराठी माणसाने यात प्रवेश केला पाहिजे. या इंडस्ट्रीमध्ये व्यापारी असोसिएशनने बाजारपेठांचा अभ्यास करून आणि आपला ग्राहक कोण असेल याचा विचार करून या व्यवसायाचा प्लॅन तयार करावा. चांगला दर्जा, डिझाईन लोकांना हवे असते. कमी गुंतवणूक आणि चांगला उद्योग उभा करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. गारमेंट असोसिएशनच्या प्रत्येक आणि अडचणीमध्ये त्यांची समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सांगितले.
सोलापूर गारमेंट व्यापारी असोसिएशनची बैठक जाधव यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री निवासस्थानातील देवगिरी येथे झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते हेमंत चौधरी, परिवहन उपक्रम ह्याचे माजी सभापती आनंद मुस्तारे प्रांतिक सदस्य महेश निकंबे, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, गारमेंट असोसिएशनचे गणेश भूमकर, अशोक चव्हाण, सुरेश बिद्री, बंशीलाल जीतूरी, अनिल भुमकर, नागेश चव्हाण आदी उपस्थित होते.