27 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeसोलापूरवाल्मीक कराडचा सुपुत्र सुशीलविरोधातील फिर्याद सोलापूर न्यायालयाकडून नामंजूर

वाल्मीक कराडचा सुपुत्र सुशीलविरोधातील फिर्याद सोलापूर न्यायालयाकडून नामंजूर

सोलापूर : आपल्याच मॅनेजरला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून दोन बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याची खासगी फिर्याद सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल झाली होती. मात्र, हा गुन्हा सोलापूरच्या न्यायालयीन स्थळसीमेत येत नाही असे सांगून गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला आहे, त्यामुळे वाल्मिक कराडच्या मुलाला सोलापूरधील फिर्याद प्रकरणी दिलासा मिळाला आहे.

सुशील कराड आणि त्याच्या साथीदारांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जबरदस्तीने घरातून उचलून नेत फिर्यादी महिलेच्या पतीकडून दोन बल्कर ट्रक, दोन कार, दोन दुचाकी व पीडितेच्या नावे असलेला प्लॉट हा अनिल मुंडे याच्या नावावर कोणतेही पैसे न देता खरेदी केला. तसेच, संबंधित महिलचे अडीच तोळे सोन्याचे दागिनेही परळीतील बालाजी ज्वेलर्सला जबरदस्तीने विकायला भाग पाडले. त्या दागिन्याचे पैसेही सुशील कराडने घेतले. तसेच, तिच्या लहान मुलीला मारहाण केली, अशी खासगी फिर्याद पीडित महिलेने सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात दिली होती. या प्रकरणी सुशील वाल्मीक कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरुद्ध ही खासगी फिर्याद दाखल केली होती.

त्यावर आज सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्या सुनावणीदरम्यान, संबंधित गुन्हा हा सोलापूर न्यायलयीन स्थळ सीमेत येत नाही. ही घटना परळी येथील आहे, त्यामुळे तेथील योग्य त्या न्यायालयात जाऊन दाद मागावी, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. सुशील कराडचे वकील संतोष न्हावकर म्हणाले, संबंधित गुन्हा सोलापूरच्या हद्दीत येत नाही, त्यामुळे सुशील कराडच्या विरोधात सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही, असा आदेश सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे.

याबाबत फिर्यादीचे वकिल विनोद सूर्यवंशी म्हणाले की, या घटनेमधील दोन्ही घटना सोलापूरमध्ये घडलेल्या होत्या, त्यामुळे आम्ही न्यायालयीनस्थळ सीमेचा जो मुद्दा आलेला आहे, त्यामध्ये आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहोत. पोलिसांनी फोक्सोचाही गुन्हा नोंद करून घेतलेला नाही. या सर्व बाबी आम्ही निदर्शनास आणून दिल्या होत्या असेही सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

संबंधित गुन्हा न्यायालयीन स्थळ सीमेत नसल्यामुळे परळी येथील कोर्टात न्यायालयात दाद मागण्याचा जो आदेश देण्यात आलेला आहे. त्याविरोधी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असेही फिर्यादीचे वकिल अ‍ॅड. विनोद सूर्यवंशी यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR