28.6 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeपरभणी‘त्या’ चोरट्यांकडून दोन दुचाकी चोरीची कबुली

‘त्या’ चोरट्यांकडून दोन दुचाकी चोरीची कबुली

मानवत : मानवत पोलिसांनी दि. २७ जुलै रोजी दरोड्याच्या तयारीत असलेल्या ४ चोरट्यांना जेरबंद केले होते. त्यांना पोलिस कोठडी मिळाल्यानंतर केलेल्या चौकशीत त्यांनी २ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या दोन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

मानवत शहरातील महाराणा प्रताप चौकात असलेल्या हिरो शोरूमजवळ दि. २७ जुलै रोजी पहाटे ३.३० वाजता संशयितरित्या वावरत असताना एका कारमधील चार जणांना वाहनासह मानवत पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरट्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. या पोलिस कोठडीत पोलिसांनी केलेल्या तपासा दरम्यान त्यांनी २ दुचाकींची चोरी केल्याचे कबूल केले.

त्यातील १ दुचाकी रामपुरी येथील शेतक-याची व २ री मंगरूळ येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या दोन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात चोरट्यांच्या फोनमधील सर्व डेटा कॉल हिस्ट्रीची माहिती प्राप्त झाल्यास यातून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती मानवत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक संदीप बोरकर यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR