25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयसंसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी होणा-या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस नेते होणार सहभागी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी होणा-या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस नेते होणार सहभागी

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई आणि राज्यसभेतील उपनेते प्रमोद तिवारी आज पावसाळी अधिवेशनापूर्वी होणा-या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुख्य समिती कक्ष, संसद भवन संलग्न, नवी दिल्ली येथे सर्वपक्षीय बैठक होणार आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार असून ते १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हे संसदेच्या दोन्ही सभागृहांतील राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत, असे संसदीय कामकाज मंत्रालयाने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR