24.6 C
Latur
Saturday, October 19, 2024
Homeमहाराष्ट्रस्मार्ट मीटर विरोधात काँग्रेसचा मोर्चा

स्मार्ट मीटर विरोधात काँग्रेसचा मोर्चा

मुंबई : स्मार्ट मीटर रद्द केली पाहिजेत अशी मागणी करत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढला आहे. या मोर्चासंबंधी काँग्रेसकडून दोन दिवसांपूर्वी परवानगी मागितली होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर गुरूवार दि. ११ जुलै रोजी खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील बीकेसी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला.

स्मार्ट मीटरविरोधात काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला असून काँग्रेसकडून दोन दिवसांपूर्वी या आंदोलनाचं पोलिसांना पत्र देण्यात आलं होतं. मात्र सुरक्षेचा कारणास्तव पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. या मोर्चानंतर पोलिसांनी आंदोलकांच्या गाड्या ताब्यात घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मुंबईतील स्मार्ट मीटर विरोधात आज काँग्रेसचे मुंबईत वांद्रे बीकेसी परिसरामध्ये आंदोलन होणार होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली.यानंतर काँग्रेस नेते बीकेसी पोलिस ठाण्यात परवानगीसाठी दाखल झालेले आहेत. तर दुसरीकडे कार्यकर्ते हे पोलिस ठाण्याबाहेर करत घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले.

सर्वसामान्यांच्या खिशाला झळ
काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईतील स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात वीज बिल येत आहे. सर्वसामान्यांना ते परडवत नाही. या वाढलेल्या विजेच्या बिलाविरोधात आम्ही मोर्चा काढणार होतो. पण उद्योगपतींना पांिठबा देणारे या सरकारने आणि पोलिस यंत्रणेने आमच्या मोर्चाला परवानगी नाकारली. विजेचे बिल कमी झाले पाहिजे, स्मार्ट मीटर रद्द झाली पाहिजेत. राज्य सरकारला मध्यमवर्गीयांचा आवाज ऐकू येत नाही.

काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
आमच्या मोर्चाला परवानगी नाकारली नसून त्यांच्यामागे असलेल्या अदृश्य शक्तीचे हे काम आहे असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. यासंबंधी आम्ही एक निवदेन देणार असून त्वरीत स्मार्ट मीटर रद्द झाली पाहिजेत अशी आमची मागणी असल्याचे त्या म्हणाल्या. आंदोलनासाठी आलेले काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांच्या गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप वर्षा गायकवाडांनी यावेळी केला.

मोदींच्या बॅनरवर चिखलबाजी
स्मार्ट मीटर विरोधात काँग्रेसने केलेल्या आंदोलनादरम्यान वांद्रे बीकेसी परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी लागलेल्या बॅनरवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी चिखल फासला. या आंदोलनाच्या दरम्यान काँग्रेस कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यानंतर चिखल फासण्यात आलेले नरेंद्र मोदींचे बॅनर पोलिसांनी काढून टाकले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR