24.6 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeमहाराष्ट्रकॉंग्रेस पक्षाला मिळणार १०० पेक्षा अधिक जागा?

कॉंग्रेस पक्षाला मिळणार १०० पेक्षा अधिक जागा?

महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला?

मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडीतील तणाव निवळला असून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. त्यामध्ये मुंबईतील बहुतांश जागांवर शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. महाविकास आघाडीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस-१०३ ते १०८ जागांवर निवडणूक लढेल तर शिवसेना ठाकरे गटाला ९० ते ९५ जागा देण्यात येणार आहेत.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ८० ते ८५ जागा देण्यात येणार असून मित्र पक्षांसाठीही जागा सोडण्यात येत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची शिष्टाई फळाला आली असून महाविकास आघाडीत मुंबई आणि विदर्भावरुन सुरू असलेला वाद अखेर निवळला आहे. बाळासाहेब थोरांत यांच्या मध्यस्थीनंतर ठाकरे आणि काँग्रेसने सामंजस्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार महाविकास आघाडीतील मुंबईच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून मुंबईत ठाकरेंची शिवेसनाच मोठा भाऊ आहे.

मुंबईत महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा ठाकरे गट लढवणार असून शिवसेना ठाकरे युबीटी पक्षाला १८ जागा देण्यात येत आहेत तर काँग्रेस १४ जागांवर निवडणूक लढेल. (त्यापैकी ११ जागांवर शिक्कामोर्तब तर २ जागांवर चर्चा सुरू आहे). शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत केवळ २ जागा मिळणार आहेत. (अणुशक्तीनगर आणि घाटकोपर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता) तर समाजवादी पार्टी- १ (शिवाजीनगर) आणि आणखी एक मित्रपक्षाला सुटणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईतील वर्सोवा, भायखळा आणि वांद्रे पूर्व या तीन जागांवर ठाकरे गट आणि कॉंग्रेसमध्ये तोडगा निघू शकतो.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR