35.1 C
Latur
Friday, May 24, 2024
Homeमहाराष्ट्रभिवंडीत काँग्रेस बंडखोरीच्या तयारीत

भिवंडीत काँग्रेस बंडखोरीच्या तयारीत

ठाणे : सांगलीच्या जागेनंतर आता भिवंडीतही महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिगणी पडताना दिसत आहे. राष्ट्रवादीने बाळ्यामामा म्हात्रेंना उमेदवारी जाहीर केल्यानतंर आता त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पैशांवाल्यांना जर उमेदवारी द्यायची असेल तर मग आम्ही काम करणार नाही असा पवित्रा घेत काँग्रेसच्या पदाधिका-यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विरोध केल्याचे दिसत आहे. आता वरून जरी आदेश आला तरी आम्ही काम करणार नाही, सर्वजण राजीनामा देऊन अशी भूमिका काँग्रेसच्या पदाधिका-यांची असल्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितले.

काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे म्हणाले की, कोकण विभागामध्ये आतापर्यंत आम्ही तीन जागा लढत होतो. मात्र यावेळी एकही जागा लढत नाही. कोकणात पंजामुक्त काँग्रेस असा प्रयोग करायचा आहे का? आमचा विरोध असतानाही राष्ट्रवादीने ही घोषणा केलेली आहे. त्यामुळे सर्व पदाधिका-यांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी आज एकत्र बैठक घेत असून पुढील भूमिका ठरवणार आहोत.

काँग्रेस ही जागा का लढत नाही हे सांगावे
जर महाविकास आघाडी ही जागा काँग्रेसला सोडत नसेल तर आपण ही जागा का लढवत नाही हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी भिवंडीमध्ये येऊन पदाधिका-यांना सांगावं. जर काँग्रेसने ही जागा घेतली नाही आणि कार्यकर्ते म्हणाले की अपक्ष लढायच किंवा मैत्रीपूर्ण लढायचे तर तरीही आम्ही तयार आहोत. मात्र आम्ही आता टोकाची भूमिका घेणार आहोत असे दयानंद चोगरे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR