28.7 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील आघाडीवर

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील आघाडीवर

सांगली :लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी धक्कादायक आकडे समोर येत आहेत. सांगलीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी मोठी आघाडी घेतलीय.

महाविकास आघाडीत सांगलीच्या उमेदवारीवरून बराच वाद झाला होता. काँग्रेस या जागेसाठी आग्रही होतं, पण शिवसेना ठाकरे गटाने आधीच चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. सांगलीत उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय फसल्याचं चित्र दिसत आहे. विशाल पाटील यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघात बाराव्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील ५२ हजार ५७३ मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपाचे संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर आहेत.सांगलीत तिरंगी लढत असून तिन्ही उमेदवार पाटील आहेत. तीन पाटलांच्या या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याने या जागेची सर्वाधिक चर्चा राज्यात झाली.

विशाल पाटलांची अपक्ष उमेदवारी
सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचीही सभा झाली होती. एक्झिट पोलमध्ये विशाल पाटील यांचे पारडे जड असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. काँग्रेसकडून विशाल पाटील यांना उमेदवारी न दिल्याने जिल्हा काँग्रेसमधील नेत्यांनी उघड नाराजीही व्यक्त केली होती. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी शेवटपर्यंत विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मात्र मविआकडून अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने शेवटी विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR