22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरकाँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्साह कायम ठेवावा

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्साह कायम ठेवावा

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातुरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख कार्यक्रमानिमित्त औसा येथे जात असताना हाश्मी चौक येथे अजहर हाश्मी युवा मंच वतीने उस्फूर्तपणे स्वागत करण्यात आले, आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा व इतर निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी असाच उत्साह कायम ठेवावा, असे आवाहन यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्य मंत्री तथा लातुरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख दि. २७ जानेवारी रोजी औसा येथील हाश्मी चौक या ठिकाणी अजहर हाश्मी युवा मंचच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, अजहर हाश्मी यांचा जनसंपर्क आणि अचानकपणे त्यांच्याकडून झालेले नियोजनबद्ध स्वागत भारावून टाकणारे आहे असे म्हणत आगामी काळातील लोकसभा निवडणूका पाहता महाविकास आघाडीचे जे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या निकालावरच विधानसभा निवडणूक निकाल अवलंबून आहे. यासाठी आपण आत्तापासूनच कामाला लागावे व औसा विधानसभेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्याला विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आगामी काळातील पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठी एकदिलाने कामाला लागून महाविकास आघाडीकडून देण्यात येणा-या उमेदवाराला निवडून आणावे लागेल. लातुरात होणा-या २९ जानेवारी रोजी काँग्रेस पक्षाच्या विभागीय बैठकीस अनेक मान्यवर ज्येष्ठ नेते येणार आहेत आपणही यावं असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी श्री वेंकटेश्वरा टायर्स सदिच्छा भेट दिली.

यावेळी लातुर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, माजी महापौर दीपक सुळ, माजी चेअरमन गणपतराव बाजुळगे, बालाजी साळुंके, इण्णाभाई कोजन, अजहर हाश्मी, दत्तू सुर्यवंशी, मौलाना कलिम मुल्ला, अकबर कोजन, डॉ. जिलानी पटेल, मुद्दसीर काजी, शकील शेख, अजमत पटेल, सचिन पाटील यांच्यासह अजहर हाश्मी युवा मंच पदाधिकारी, सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR