27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडाविनेश फोगाट विरोधात कारस्थान

विनेश फोगाट विरोधात कारस्थान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगाट ५० किलो वजनी गटातून ऑलिम्पिक फायनलसाठी पात्र ठरली होती. विनेश फोगाट फायनलसाठी अपात्र ठरल्यानंतर कुटुंबाची प्रतिक्रिया समोर आली आहे. विनेशच्या कुटुंबाने फेडरेशनवर गंभीर आरोप केले आहेत. फेडरेशनने तिच्याविरोधात कारस्थान रचल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, भारताला खूप मोठा धक्का बसला आहे. पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतूनत आज गोल्ड मेडलची अपेक्षा होती. विनेश फोगाटचे सासरे राजपाल राठी म्हणाले की, ‘१०० ग्रॅम वजन किती जास्त असते. डोक्यावरच्या केसांमुळे सुद्धा १०० ग्रॅम वजन वाढते’ त्याशिवाय त्यांनी सरकार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृज भूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विनेश फोगाट फायनलसाठी अपात्र ठरली त्यामध्ये सरकार आणि बृज भूषण शरण सिंहचा हात असल्याचा आरोप केला आहे.

यामध्ये राजकारण सुरु आहे. हे षडयंत्र आहे. यात सरकारचा हात आहे. १०० ग्रॅम वजनामुळे कोणाला काढले जाते?. डोक्यावरच्या केसांमुळे सुद्धा १०० ग्रॅम वजन वाढते. अजूनपर्यंत विनेश फोगाट बरोबर मी बोललेलो नाही. विनेशने वारंवार म्हटले आहे. माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यात आला आहे. जयपूर आणि अन्य ठिकाणी ती या बद्दल बोलली आहे. फोगाट बाहेर गेल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. काल फाईट झाली त्यावेळी तिचे वजन जास्त का नव्हते? असा सवाल राजपाल राठी यांनी विचारला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR