24.3 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमहाराष्ट्रमला बदनाम करण्याचा कट; चैतन्य महाराज वाडेकरांचा आरोप

मला बदनाम करण्याचा कट; चैतन्य महाराज वाडेकरांचा आरोप

पुणे : प्रतिनिधी
प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांच्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. बेकायदा जमाव जमवून जेसीबी – पोकलेन मशिनच्या सहाय्याने कंपनीच्या रस्त्यावर खड्डे पाडून आणि गॅस पाईपलाईन तोडून लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यासह अनोळखी दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मी प्रसिद्ध कीर्तनकार असल्याने मला बदनाम करण्याचा हा संबंधित बिल्डरचा कट असल्याचा आरोप चैतन्य महाराज वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

चैतन्य महाराज वाडेकर यांच्यासह यांचे दोन भाऊ अ‍ॅड. अमोल आणि प्रमोद वाडेकर व नातेवाईक यांना म्हाळुंगे पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर चैतन्य वाडेकर यांनी पुण्यातील पत्रकार भवन येथे त्यांची बाजू मांडली.

त्यावेळी त्यांनी पीएमआरडीएच्या भ्रष्ट अधिका-यांचा बिल्डरला पाठिंबा असून संबंधित बिल्डरकडून त्यांच्या जागेत अतिक्रमण केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एका कंपनीचा रस्ता उकरल्यामुळे अटक झाल्याच्या अर्धवट माहितीच्या आधारे बातम्या प्रसारित झाल्या आहेत. मात्र, यातून संबंधित बिल्डरकडून माझे नाव खराब करण्याचा हेतू असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR