19.5 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeमहाराष्ट्रबांगलादेशींना भारतीय नागरिक बनविण्याचे षडयंत्र

बांगलादेशींना भारतीय नागरिक बनविण्याचे षडयंत्र

किरीट सोमय्या यांचा आरोप

नागपूर : २०२४ मध्ये दोन लाख बांगलादेशी (रोहिंग्या) स्थलांतरितांना महाराष्ट्रात भारतीय नागरिक बनवण्याचे मोठे षडयंत्र रचले गेले. यासाठी बेकायदेशीर पद्धतीने जन्मदाखले तयार केले गेले. १ लाख ७ हजार लोकांना जन्मदाखले वितरित झाले. तर ९० हजार लोकांच्या जन्मदाखल्यांची प्रक्रिया सुरू आहे, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. हे सर्व जन्मदाखले उशिरा सादर झाले असून या सर्वांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

किरीट सोमय्या यांनी सांगितले की, रोहिंग्या बांगलादेशी प्रमाणपत्र घोटाळ्याअंतर्गत विविध जिल्ह्यांत जन्मदाखल्यासाठी उशिरा अर्ज करणा-यांची माहिती मिळवली आहे. यात धक्कादायक माहिती हाती आली. अनेक जणांनी तर ७० वर्षांनंतर अर्ज केला आहे. वोट जिहाद अंतर्गत बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय नागरिक बनवण्याचे षडयंत्र रचले गेले. काँग्रेस, उद्धव ठाकरे सेना, एमआयएम, दहशतवादी संघटना आणि बॉर्डरवरील दोन एजंट यांनी हे षडयंत्र रचले आहे.

हा मोठा गेम प्लॅन आहे. सरकारने याची दखल घेत एसआयटी स्थापन केली आहे. एसआयटीने आपले काम सुरू केले आहे. राज्यभरात मोठ्या प्रमणावर जन्मदाखले वितिरत करण्यात आले आहेत. मालेगावात दोन अधिकारी निलंबित झाले आहेत. इतर जिल्ह्यातील आणखी काही अधिकारी निलंबित होतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला. याअंतर्गत किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी नागपूरच्या जिल्हाधिका-यांची भेट घेतली. नागपूर जिल्ह्यातही ४ हजारांवर जन्मदाखले हे उशिरा सादर झाल्याचे सांगण्यात येते. याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

सर्वांचा शोध घेऊन बांगलादेशात पाठवा
आतापर्यंत ज्या १ लाख ७ हजार बांगलादेशी रोहिंग्यांना जन्मदाखले वितरित केले, त्यांचा आणि ज्या ९० हजार लोकांच्या प्रमाणपत्रावर कारवाई सुरू आहे, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांना बांगलादेशात परत पाठवण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

मालेगाव बँक घोटाळ्यातला पैसा
सोमय्या यांनी सांगितले की, ३७ तालुक्यांत जाऊन आलो किंवा माहिती मिळवली, त्यात ९९ टक्के रोहिंग्या बांगलादेशी मुस्लिम आहेत. त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही. हे कटकारस्थान मालेगावमध्ये सुरू झाले. आणि यासाठी मालेगावमध्ये जो बँक घोटाळा झाला त्यातून पैसे पुरवण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR