26.4 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeमहाराष्ट्रकंटेनर-एसटीची समोरासमोर धडक; १९ प्रवासी जखमी

कंटेनर-एसटीची समोरासमोर धडक; १९ प्रवासी जखमी

चंद्रपूर : प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील बाम्हणी-मांगली फाट्यावर एसटी आणि कंटेनरचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एसटीने कंटेनरला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की एसटीमधील १९ प्रवासी जखमी झाले आहेत. यामधील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातामध्ये नेमकी चूक कोणाची होती याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. नेमका हा अपघात कुठे झाला जाणून घ्या.

ही घटना मंगळवारी बाम्हणी-मांगली फाट्यावर घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात बळी गेला नाही. भंडारा जिल्ह्यातील पवनी आगाराची बस २५ प्रवाशांना घेऊन नागभीड मार्गाने निघाली होती.

नागभीडपासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या बाम्हणी-मांगली फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणा-या कंटेनरने धडक दिली. धडक होताच मोठा आवाज झाला. जिथे अपघात झाला तिथे तलाठी कार्यालय होते. तलाठी वृषाली दाचेवार यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती त्यांनी नागभीड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

गंभीर जखमी झालेल्या एका प्रवाशाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित जखमी प्रवाशांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. या अपघातात एसटी बसचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. परिवहन महामंडळातील अधिका-यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी सुरू केली आहे. नागभीड पोलिस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे चंद्रपुरात वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR