परभणी : सन २०२४-२५ या कापूस हंगामासाठी परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात भारतीय कपास निगम लि. (सी.सी.आय.) मार्फत शासकीय हमीदराने दि. ११ नोव्हेंबर पासून अरिहंत फायबर्स, गंगाखेड रोड, परभणी येथे खरेदी केंद्रावर कापूस खरेदीस सुरूवात केली जाणार आहे.
परभणी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील ज्या शेतक-यांनी आनलाईन नोंदणी केली आहे अशा शेतक-यांनी सी.सी.आय.च्या अरिहंत फायबर्स परभणी या खरेदी केंद्रावर आपला कापुस विक्रीस आणावा. सोबत चालु आर्थिक वर्षाचा ऑनलाईन ७/१२ उतारा व कापुस पीकपेरा तसेच बॅक खात्याला आणि मोबाईलला ंिलक असणा-या आधारकार्डची झेराक्स प्रतीसह आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईलसह प्रत्यक्ष हजर राहावे.
सी.सी.आय.द्वारे ८ ते १२ टक्यांपर्यंत मॉईश्चर असलेला कापुस खरेदी केल्या जाणार असून टक्के पेक्षा जास्त आर्द्रता असलेल्या कापसास प्रत्येकी १ टक्के आद्रतेसाठी १२ टक्केपर्यंत शासनाचे किमान आधारभुत किंमतीने जाहीर केलेला हमीदरानुसार बाजार भाव देण्यात येईल. १२ टक्केच्यावर आर्द्रता असलेला कापुस खरेदी केल्या जाणार नसून पिवळा पडलेला, पावसात (पाण्यात) भिजलेला कापुस खरेदी केला जाणार नाही. सर्व शेतकरी बांधवांनी ओला व खराब कापुस विक्रीस न आणता कापुस वाळवून विक्रीस आणावा. जेणेकरुन शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त बाजार भाव प्राप्त होईल.
भारतीय कपास निगम लि. (सी.सी.आय.) मार्फत दि. ६ नोव्हेंबरपासून आनलाईन नोंदणी सुरु झालेली आहे. ज्या शेतकरी बांधवांना आपला कापुस विक्रीस आणावयाचा आहे अशा शेतक-यांनी परभणी बाजार समितीच्या कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहुन नोंदणी केल्यानंतर त्यांचा कापुस सी.सी.आय. मार्फत खरेदी केला जाणार आहे.
नोंदणी व्यतिरीक्त कोणत्याही प्रकारे सी.सी.आय. मार्फत कापुस खरेदी केला जाणार नाही याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घेऊन बाजार समितीस सहकार्य करावे असे आवाहन सी.सी.आय.चे प्रतिनिधी व बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.