28.8 C
Latur
Sunday, March 3, 2024
Homeसोलापूरएक बुथ दहा शिव दूत निर्माण करा

एक बुथ दहा शिव दूत निर्माण करा

करमाळा (प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना निर्माण केल्या असून ह्या योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्यासाठी शिवदूत नेमणे गरजेचे असून प्रत्येक बुथवर दहा शिवदूत नेमा अशा सूचना मुख्यमंत्री जनकल्याण कल्याण कक्षाचे कक्ष प्रमुख बिरदेव वाघमोडे यांनी दिल्या.

करमाळा शिवसेना कार्यालयात बिरूदेव वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली.शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे ,करमाळा विधानसभा तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, शहर प्रमुख नागेश काळे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, युवा सेना शहरप्रमुख शिवाजी गायकवाड, युवासेना तालुकाप्रमुख नवनाथ गुंड ,उपजिल्हाप्रमुख श्रीकांत गोसावी,जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे ,तालुकाप्रमुख देवानंद बागल,उपतालुकाप्रमुख प्रशांत नेटके, सतीश रुपनवर दादासाहेब थोरात, डॉक्टर कारंडे ,महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख ज्योती शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बिरूदेव वाघमोडे म्हणाले की करमाळा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला असून धनुष्यबाण चिन्हावर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही विधानसभा जिंकण्यासाठी प्रत्येक गाव खेड्यात शिवसेना मजबूत करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी आणलेल्या योजना तळागाळात पोहोचण्यासाठी काम करावे असे आवाहन केले.शिवसेनेचे पद मिळवण्यासाठी नसून किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही पक्षाच्या आदेशाप्रमाणे संघटन मजबूत करण्याचे काम ज्यांना जमत नाही अशांनी स्वतःहून पद मुक्त व्हावे असे आव्हान बिरदेव वाघमोडे यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR