22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरप्रार्थना फाऊंडेशन आयोजित कृतिशील तरुणाई शिबिराचा समारोप उत्साहात

प्रार्थना फाऊंडेशन आयोजित कृतिशील तरुणाई शिबिराचा समारोप उत्साहात

सोलापूर : तरुणांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजे आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे.अडचणी येत राहतील जात राहतील त्याला हिमतीने सामोरे जा व स्वतःला सिद्ध करून दाखवा असे मत प्रिसीजन फाऊंडेशन च्या अध्यक्षा सुहासिनी शहा यांनी व्यक्त केले. प्रार्थना फाऊंडेशन व सेवादायी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे कृतिशील तरुणाई शिबिर मोरवंची येथे आयोजित करण्यात आले होते शिबिराच्या समारोपाच्या प्रसंगी सुहासिनी शहा बोलत होत्या.

कृतिशील तरुणाई या निवासी शिबिराचा समारोप समारंभ प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा, व्याख्याते शिवरत्न शेटे, माविम चे अधिकार सोमनाथ लामगुंडे, उपसरपंच यशवंत कुंभार, मोरवंची गावातील प्रतिष्ठित नागरिक सुरेश धोत्रे, अनु मोहिते, मनीषा सरवळे यांच्या उपस्थितीत पार पडला. आजच्या युवकांमधे सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी व समाजाभिमुख तरुण निर्माण व्हावा हा शिबिर घेण्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे मत सोमनाथ लामगुंडे यांनी व्यक्त केलं. अन्नदाता असून सुद्धा शेतकऱ्याची कशाप्रकारे अवहेलना होत आहे त्यामुळे आजच्या युवकांना सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहणे गरजेचे आहे.शेतकरी हा व्यवस्थेचा कणा आहे त्याला आपण साथ दिली पाहिजे असे व्याख्याते शिवरत्न शेटेनी त्यांच्या व्याख्यानात सांगितले.

सदर शिबिरात महाराष्ट्र भरातील युवक-युवती सहभागी झाले होते.यामधे विविध क्षेत्रात अग्रेसर काम करणाऱ्या मंडळींनी शिबिरार्थ्यांना मार्गदर्शक केले. विविध प्रकारचे खेळ आणि ॲक्टिव्हिटी मधुन मनोरंजन, सामाजिक धडे आणि आनंदाने आयुष्य जाणण्याची कला शिबिरार्थ्याना शिकता आली तसेच भरडूच्या माध्यमातून समाजप्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन ही करण्यात आले. त्याच बरोबर नवीन मित्रमंडळी आणि परिवार त्यांना या शिबिरात भेटला. हे शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी प्रार्थना फाउंडेशन व सेवादायी सोशल फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्ते तसेच सेवाधार्‍यांनी सहयोग केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR