हिंगोली : कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या घरासमोर गोळीबार केल्याची फेसबुक पोस्ट करणे ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांना भोवले आहे. अयोध्या पोळ यांच्या विरोधात हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या हिंगोली शहरातील घरासमोर २७ मे रोजी एका व्यक्तीने शिवीगाळ करत गोळीबार केल्याचा दावा ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक आयोध्या पोळ यांनी केला आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.