27.1 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांवरील टीका गोपीचंद पडळकरांना भोवणार?

शरद पवारांवरील टीका गोपीचंद पडळकरांना भोवणार?

भाजपच्या वरिष्ठ नेत्याने टोचले कान

मुंबई : मारकडवाडीतील सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली. टीका करत असताना शरद पवारांविषयी त्यांनी अपशब्द वापरले. याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत असून विविध राजकीय पक्षांचे नेते पडळकर यांचा निषेध करत आहेत. पडळकर यांच्या वक्तव्याची दखल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे.
बावनकुळे म्हणाले, शरद पवार हे मान्यवर नेते आहेत. त्यांच्यावरील व्यक्तिगत टीका-टिप्पणी आणि खालच्या पातळीवरील टीका मान्य नाही. जे याच पद्धतीचे वक्तव्य करतायेत त्यांना योग्य समज देऊ.

शरद पवार आणि आमची वैचारिक भूमिका वेगळी आहे. मात्र त्यांच्यावरील व्यक्तिगत टीका-टिप्पणी पक्षाला मान्य नाही. महाराष्ट्रातील कुठल्याही नेत्याबद्दल निंदनीय वक्तव्य आम्हाला मान्य नाही, असे बावनकुळे म्हणाले.

युगेंद्र पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले त्यांच्याकडून आम्ही काही वेगळी अपेक्षा करत नाही. त्यांनी करत असलेली टीका आमच्यासाठी वेगळी नाही. ते सतत काही तरी बोलत असतात. वाईट एवढंच वाटतं की, ते आता महायुतीमध्ये आहेत. आणि एक राष्ट्रवादी महायुतीचा भाग आहेत.

शरद पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. देशातील ते मोठे नेते आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील लोक त्यांचा आदर करतात. त्यांच्याबद्दल किंवा कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीबाबत असे बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असे बोलणे महाराष्ट्राला आवडत नाही, असे देखील युगेंद्र पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR