गुवाहाटी : राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या १८ व्या मोसमातील ११ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी १८३ धावांचे आव्हान दिले आहे. राजस्थानने २० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून १८२ धावा केल्या.
राजस्थानासाठी नितीश राणा याने सर्वाधिक धावा केल्या. तसेच कर्णधार रियान पराग यानेही ३० पेक्षा अधिक धावांचे योगदान दिले. तसेच संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर या दोघांनाही दुहेरी आकडा गाठला. मात्र इतरांनी चेन्नईच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. त्यामुळे राजस्थानला स्फोटक सुरुवातीनंतरही २०० पार पोहचता आले नाही.