24.2 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeसोलापूरझरीतील एटीएम बंद असल्याने ग्राहक हैराण

झरीतील एटीएम बंद असल्याने ग्राहक हैराण

झरी : झरी एसबीआय बँकेचे एटीएम ब-याच महिन्यांपासून बंद असल्याने हजारो खातेदार एटीएम सेवेपासून वंचित आहेत. कित्येक महिन्यांपासून बंद असलेले एटीएम सुरू न झाल्याने खातेदारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याकडे लक्ष देवून एटीएम तात्काळ सुरू करावे अशी मागणी एसबीआय शाखाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

झरी परीसरातील पिंपळा, टाकळी बोबडे, वाडी दमई, जलालपूर, जवडा व परिसरातील हजारो नागरिकांचे खाते एबीआय या बँकेत आहे. झरी गावात एकच एटीएम असल्यामुळे ग्राहकांना दुसरा पर्याय नाही. एटीएम कार्ड असून सुद्धा एसबीआय ग्राहक सेवा केंद्र वाल्यांना पैसे काढण्याचा जादा मोबदला द्यावा लागत असल्याने ग्राहक हतबल झाले आहे. एटीएमबाबत संबंधित अधिका-यांकडे चौकशी केली असता एटीएम मधील पार्ट निकामी झाला आहे व आम्ही परभणी येथील मुख्य शाखा येथे कळविले असून लवकरच दुरुस्ती केली जाईल असे सांगण्यात आले. एटीएम बंद असल्याने बँकेतील कर्मचारी वर्गावर देखील त्याचा खूप ताण येत आहे. वयोवृद्ध, शेतकरी, विद्यार्थी यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

वरीष्ठ पातळीवरून या प्रश्नाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर एटीएम सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन एसबीआय शाखा अधिकारी यांना देण्यात आले. या निवेदनावर कृष्णा काळंखे, अजय सावंत, शंकर देशमुख, अर्जुन सावंत, समीर खतीब आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR