26.4 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeराष्ट्रीयरेडीमेड वस्तूंवरील कस्टम ड्युटी वाढण्याची शक्यता

रेडीमेड वस्तूंवरील कस्टम ड्युटी वाढण्याची शक्यता

भुवनेश्वर : वृत्तसंस्था
भारतातील कच्चा मालाचा वापर करून इतर देशात उत्पादन तयार करून ते पुन्हा भारतात आणून विकणे हे अयोग्य असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले होते. ओडिशामधील भुवनेश्वर इथे उत्कर्ष ओडिशा, मेक इन ओडिशा या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. सध्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याचे त्यांनी संकेत दिल्याचे बोलले जात आहे.

१ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलेल्या मताचे प्रतिबिंब अर्थसंकल्पातही दिसण्याची शक्यता आहे. याचाच एक भाग म्हणून भारत सरकार तयार वस्तूंच्या आयातीवर लागणारी कस्टम ड्युटी वाढवण्याची शक्यता आहे. खासकरून इलेक्ट्रॉनिक उत्पादने, वैद्यकीय उत्पादने आणि अशाच स्वरुपाच्या इतर गोष्टींवरील कस्टम ड्युटी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे या गोष्टींच्या किंमती वाढतील असे बोलले जात आहे.

सध्या वॉशिंग मशीन, डिशवॉशरसारख्या इलेक्ट्रीक वस्तूंवर १० टक्के कस्टम ड्युटी आकारली जाते. हे शुल्क वाढवले जाऊ शकते. व्हिएतनाममधून येणारे ब्लड प्रेशर मोजण्याचे मशीन, ऑक्सिमीटर यासारख्या उत्पादनांवरीलही कस्टम ड्युटी वाढवली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने मेक इन इंडिया मोहिम हाती घेतली असून यामध्ये सुईपासून उपग्रहापर्यंत हरत-हेच्या वस्तूंचे भारतामध्येच उत्पादन व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांना बळकटी मिळावी यासाठी कस्टम ड्युटी वाढवण्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR