पुणे : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. विमान नगर परिसरात आग लागल्याची मोठी घटना घडली आहे. पुण्यातील विमान नगरमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
एकाचवेळी दहा सिलिंडर फुटल्याने हा स्फोट झाल्याचे समजते. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
पुण्यातील विमान नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत बेकायदेशीररीत्या सिलिंडरचा साठा करण्यात आला होता. तब्बल १०० सिलिंडर बेकादेशीरपणे साठवण्यात आले होते. यामधील १०० पैकी १० सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग नियंत्रणात आली आहे.