22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकच्या वालदेवी नदीत मृत माशांचा खच

नाशिकच्या वालदेवी नदीत मृत माशांचा खच

नाशिक : प्रतिनिधी
एकीकडे नाशिकसह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. नांदगाव, मनमाड, मालेगाव, देवळा तालुक्यात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. यामुळे खरिपाच्या पेरणीला सुरुवात करता येणार असल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यातच आता वालदेवी नदीत लाखो मासे मृत्युमुखी पडल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, नाशिकच्या वालदेवी नदीत लाखो मासे मृत अवस्थेत आढळून आल्याचे समोर आले हे. जवळपास दोन किलोमीटरच्या नदीतील परिसरात हे मासे मृत अवस्थेत आढळून आले आहेत. महानगरपालिकेची ड्रेनेज लाईन फुटल्याने दूषित पाण्यामुळे मासे मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मृत मासे पाण्यावर तरंगत असून नदीतील पाण्यात विविध प्रकारचे जिवाणू देखील आढळल्याचे समोर आले आहे. स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

याआधीही वालदेवी नदीपात्रातील नांदूरमध्यमेश्वर नदीपात्रात हजारो मासे मृत झाल्याची घटना घडली होती. गटारींच्या आणि कारखान्यांमधील रसायनयुक्त प्रदूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR