मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. समीर खान यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
समीर खान यांचा अपघात झाला होता. त्यावेळी त्यांच्या पत्नी निलोफर देखील त्यांच्या सोबत होत्या. या प्रकरणी पोलिसांनी कारचालक अबुल मोहम्मद सोफ अन्सारी याच्यावर गुन्हा दाखल केला होता. माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर खान आणि त्यांचे जावई समीर खान हे कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात नियमित तपासणी करण्यासाठी गेले होते.
तपासणी झाल्यानंतर ते घरी जाण्यासाठी रुग्णालयातून बाहेर आले आणि समीर खान यांनी कारचालकाला गाडी काढण्यास सांगितली. त्यावेळी गाडीत बसत असताना कारचालकाचा पाय चुकून अॅक्सिलेटवर पडल्यामुळे समीर खान गाडीसोबत काही अंतरापर्यंत फरफटत गेले होते.