31 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रग्रामसेवकाला जीवे मारण्याची धमकी

ग्रामसेवकाला जीवे मारण्याची धमकी

विरली : प्रतिनिधी
ग्रामपंचायतीमधील प्रलंबित कामे आटोपून कार्यालयीन कामकाजासाठी मुख्यालयी जात असलेल्या ग्रामसेवकाला ग्रामपंचायत सदस्याने रस्त्यात अडवून अश्लील शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली गेली.

ग्रामसेवक संजय गहाने यांच्या फिर्यादीवरून लोकेश एकनाथ भेंडारकर (रा. विरली-बूज) याच्याविरोधात लाखांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे ग्रामसेवक संवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संजय गहाने हे विरली-बूज ग्रामपंचायतीत ग्रामसेवक असून, त्याच लोकेश भेंडारकर हा ग्रामपंचायत सदस्य आहे. यापूर्वी या ग्रामसेवकाकडे नजीकच्या विरली/खुर्द ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार होता. काही दिवसांपूर्वी पंचायत समिती प्रशासनाने विरली/खुर्द येथील कार्यभार काढून आथली ग्रामपंचायतीचा कार्यभार देण्यात आला आहे.

सोमवारी ग्रामसेवक संजय गहाने हे विरली/खुर्द ग्रामपंचायतीमधील प्रलंबित कामे आटोपून मुख्यालय विरली/बूज कडे येण्यासाठी निघाले असता दुपारी एकच्या सुमारास विरली/खुर्द ते विरली/बूज मार्गावर ग्रामपंचायत सदस्य लोकेश भेंडारकर याने ग्रामसेवकास रस्त्यात अडवून अश्लील शिवीगाळ करत ‘तू जर मी सांगितलेले काम केले नाही तर तुला जिवानिशी मारून टाकीन’ अशी धमकी दिली.
दरम्यान, लाखांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास पोलिस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे करत आहेत. या घटनेने ग्रामसेवक संवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR