28.9 C
Latur
Sunday, February 25, 2024
Homeमहाराष्ट्रमोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या

मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या

पुणे : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुन्ना पोळेकरच्या नावाने अकाऊंट बनवत स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्वाती मोहोळ यांना मेसेज करुन आणि आक्षेपार्ह पोस्ट करत हा प्रकार केलाय.

मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याच्या नावानेच या धमक्या देण्यात येत आहेत. पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरु आहे. काही दिवसापूर्वीच पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडत करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरुच आहेत. शरद मोहोळची पत्नी काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर आली होती. माझ्या पतीच्या जाण्याने मी खचणार नाही, असेही तिने स्पष्ट केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR