27.1 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeमहाराष्ट्रचामुंडी एक्सप्लोसिव्ह स्फोटातील मृतकांचा आकडा नऊवर

चामुंडी एक्सप्लोसिव्ह स्फोटातील मृतकांचा आकडा नऊवर

नागपूर : प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यातील धामना येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतकांचा आकडा आता नऊवर पोहोचला आहे. प्रमोद चवारे नामक २४ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान काल शनिवारी रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला होता. तर या स्फोटातील जखमीवर दंदे रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर आता मृत्यूशी झुंज देणा-या श्रद्धा वनराज पाटील (वय २२, रा. धामना) हिचा शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मृत्यू झाला.

गुरुवारी (दि. १३ जूनच्या) दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात घटनास्थळीच सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. या जखमींवर नागपुरात उपचार सुरू होते. दरम्यान, आता या घटनेतील बळींची संख्या नऊवर पोहोचली आहे. या मृत्यूच्या घटनेने मृतकांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूर शहरातील नागपूर-अमरावती महामार्गावरील धामना या परिसरात ही चामुंडी एक्सप्लोसिव्ह नामक स्फोटके तयार करणारी कंपनी आहे. गुरुवारी दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास या कंपनीत भीषण स्फोट झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR