मंगळवेढा : प्रधानमंत्री फसल बिमा योजनेत पीक नुकसानीची तक्रार देण्यासाठी ७२ तासांचा कालावधी विमा कंपनीने निश्चित केला असला तरी प्रत्यक्ष पिकाचे पंचनामे करण्यासाठी कोणच फिरकले नसल्यामुळे शेतकरी वर्गातून विमा कंपनीच्या मनमानी कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यात बाजरी, तूर, मका, कांदा या पिकाचा विमा अँग्री इन्शुरन्स कंपनीकडे भरला आहे. शासनाने यंदा एक रुपयात विमा शेतकऱ्यांसाठी केल्यामुळे ८ मंडलमधून जवळपास ६८ हजार शेतकऱ्यांनी ५२ हजार हेक्टरवर विमा भरला. पावसाचा खंड पडल्यामुळे पिके जळून गेली. विमा कंपनीने तालुक्यातील आंधळगाव आणि भोसे या दोन महसूल मंडळाला पंचनामे करण्याऐवजी बाजरी व मका या पिकासाठी २५ टक्के अग्रिम रक्कम देखील काही निवडक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली.
त्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीतही सर्वच महसूल मंडळाला अग्रिम देण्याची मागणी केली. परंतु सध्या फक्त दोन मंडलामधील निवडक शेतकऱ्यांना दिल्यामुळे उर्वरित मंडलामधील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. तर तूर पिकाच्या नुकसानीची कल्पना विमा कंपनीला दहाव्या महिन्यात दिली. अद्याप कंपनीचे प्रतिनिधी पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकले नाहीत, या संदर्भात विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने ६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम जमा केल्याचे सांगून उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने जमा करत असल्याचे सांगितले. परंतु नुकसानीच्या पंचनाम्याचा विभाग दुसऱ्याकडे असल्याचे सांगत सविस्तर माहिती देण्यास मात्र टाळाटाळ केली.
अद्यापही उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही. तालुक्यातील सर्वच मंडळाचा समावेश करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यास काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी पाठिंबा दिला.पाऊस लांबल्यामुळे तुरीचे पीक जळून गेले, जळालेल्या पीक नुकसानीची तक्रार ७२ तासाच्या करूनही विमा कंपनीचे कोणताही प्रतिनिधी अद्याप नुकसानाची पाहणीसाठी आलेला नाही. विमा कंपनी पंचनामे करत नसेल विमा भरायचा कशासाठी असा प्रश्न आहे.
दुष्काळामुळे खरीप पिके गेल्यामुळे अग्रिम सर्व मंडलातील शेतकऱ्यांना मिळावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन केल्यानंतर शासनाने सर्व मंडलाचा समावेश करून दिवाळीपूर्वी शेतकन्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करून दिवाळी गोड करू म्हणणान्यांनी अद्याप खात्यामध्ये पैसे जमा केले नाहीत. लोकसभासमोर आल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पैसे सोडत्यावर मतदान मिळेल, या आशेपोटी शेतक-याचे पैसे थांबवून ठेवल्याची शंका वाटते.असे स्वाभिमानी शेतकरी संघटना, पश्चिम महाराष्ट्र.युवा आघाडी चे अॅड राहुल घुले म्हणाले.