24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयदिल्ली बनले सर्वाधिक इलेक्ट्रिक बस असलेले शहर!

दिल्ली बनले सर्वाधिक इलेक्ट्रिक बस असलेले शहर!

नवी दिल्ली/ मुंबई : देशाची राजधानी दिल्ली सर्वाधिक इलेक्ट्रिक बसेस असलेले शहर बनले आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी दिल्लीच्या विद्यमान बस ताफ्यात ५०० इलेक्ट्रिक बसेस जोडल्या गेल्या आहेत. याआधी इतक्या इलेक्ट्रिक बसेसचा एकाच वेळी ताफ्यात समावेश करण्यात आला नव्हता. दिल्लीचे राज्यपाल विनय कुमार सक्सेना आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली परिवहन महामंडळाच्या इंद्रप्रस्थ डेपोमध्ये या बसेसना हिरवा झेंडा दाखवून दिल्ली परिवहन महामंडळाच्या (डीटीसी) ताफ्यात समाविष्ट केले.

परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनीही सांगितले की, सध्या दिल्लीच्या रस्त्यावर लो फ्लोअर सीएनजी बस धावत आहेत. २०१० मध्ये राष्ट्रकुल खेळादरम्यान त्यांना विकत घेण्यात आले होते आणि आता त्यांच्या निवृत्तीची वेळ आली आहे. तसेच भारतीय इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उद्योगात २०२३ मध्ये चांगली वाढ निदर्शनास आली आहे.

तसेच मुंबईचा जीव म्हटल्या जाणाऱ्या बेस्टच्या बसेस २०२७ पर्यंत बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्टच्या (बेस्ट) सर्व बस स्वच्छ ऊर्जेवर धावतील, त्यापैकी बहुतांश बस या इलेक्ट्रिक असणार आहेत. सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. उदय सामंत पुढे म्हणाले की, ३००० बस इलेक्ट्रिक आणि २०० बस सीएनजीवर चालवण्याचे काम पूर्ण झाले आहे.

२०२७ पर्यंत संपूर्ण बससेवा प्रदूषणविरहित इंधनावर चालवण्याची बेस्टची योजना आहे. त्यामुळे मुंबईतील कार्बन फूटप्रिंट कमी होणार आहे. २०१८-१९ मध्ये बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या ३३ लाखांच्या पुढे गेली होती, या लोकांच्या अनुभवात आणखी सुधारणा करण्याचे काम सुरू आहे.

६ हजार इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचे आदेश
दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश संघहलोत म्हणाले, दिल्लीत आता एकूण १३०० इलेक्ट्रिक बसेस आहेत. एवढेच नाही तर दिल्लीच्या केजरीवाल सरकारने आणखी ६,००० इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. आता एकूण ७२०० बसेस (डीटीसी आणि क्लस्टरसह) दिल्लीतील रस्त्यावर आहेत.

२०२५ पर्यंत दिल्लीत १०,५०० बसेस
केजरीवाल सरकारचे लक्ष्य आहे की, २०२५ पर्यंत दिल्लीत एकूण १०,५०० बसेस असतील, त्यापैकी ८० टक्के बसेस इलेक्ट्रिक असणार आहेत. अशा परिस्थितीत दिल्लीच्या रस्त्यावर एकीकडे नवीन इलेक्ट्रिक बसेस येत असताना दुसरीकडे जुन्या सीएनजी बसेसही बंद केल्या जात आहेत. यासोबतच आम्ही दिल्लीच्या हवेतील कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR