पालम : पालम तालुक्यात खरीप हंगामात कोरडा दुष्काळ जाहीर करावा. दि.२७, २८ व २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप व रब्बी पिकांचे झालेल्या नुकसान भरपाईपोटी हेक्टरी ५० हजाराची मदत शेतक-यांना देण्यात अशी मागणी पिक विमा चळवळीचे अभ्यासक हेमचंद्र शिंदे यांनी केली आहे. पालम तहसील कार्यालय समोरील धरणे आंदोलनात उपस्थित शेतक-यासमोर ते बोलत होते.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, खरीप हंगाम २०२३मध्ये पालम तालुक्यात घोषित होणे अपेक्षित होते. खरीप हंगामात अत्यल्प पावसामुळे सोयाबीन, मुग कापूस पिकाचे उत्पादनात कमालीची घट झाली. तालुक्यात खरीप हंगामात कोरड्या दुष्काळ स्थिती होती. त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे दि. २७, २८ व २९ नोव्हेंबर रोजी पालम तालुक्यासह महाराष्ट्रात अवकाळी व गारपिटीचा पाऊस झाल्याने खरिपातील कापूस व तुर पिकाचे नुकसान झाले. रब्बी हंगामातील हरभरा, करडी, जवारी ,गहू या पिकाची पेरणी केली. परंतु जास्त पावसाने हरभरा पिकास बाधा येऊन बुरशीजन्य रोगामुळे मर लागून हरभरा क्षेत्र बाधित झाले आहे. काही शेतक-यांनी रब्बीची दुबार पेरणी केली आहे.
मात्र पालम तालुका प्रशासनाने नुकसानीचे रब्बी हंगामातील क्षेत्र अत्यल्प असल्याचा अहवाल वरिष्ठाकडे पाठवून शेतक-यावर अन्याय केला आहे. शेतक-यांना यापुढे ८५०० ऐवजी हेक्टरी ५०००० हजार नुकसान भरपाई देण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले असल्याची शिंदे यावेळी म्हणाले. या प्रसंगी शेतकरी गोविंद लांडगे, शिवाजी दिवटे, भगवान करंजे, स्वप्निल निळे, निवृत्ती सारोळे, हनुमान देशमुख, निवृत्ती पिंपळपल्ले, विश्वंभर गोरवे सोनपेठ आदी शेतक-यांनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान तहसीलदार कैलास चंद्र वाघमारे, नायब तहसीलदार पवळे, तालुका कृषी विभागाचे प्रभारी अधिकारी व कृषी प्रर्यवेशक दत्तराव दुधाटे यांनी धरणे आंदोलनस्थळी शेतक-यांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर तहसीलदार वाघमारे यांनी शेतक-यांना सकारात्मक भूमिका घेऊन वरिष्ठाकडे अहवाल पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी पालम तालुक्यातील लिंबाजी टोले, रुपेश शिनगारे, बालाजी बरडे दत्तराव गौरकर, गोपाळ तुरनर, विठ्ठल कदम, अजय कदम, विष्णू जाधव, विश्वनाथ शिंदे, भागवत शिंदे, लहू बोराटे, अनिल म्हस्के, मलिकार्जुन लांडगे, राजेंद्र माने, विष्णू जाधव, भागवत शिंदे, रुस्तुम शिंदे, राम गावंडे, नारायण दुधाटे, सदाशिव मोगरे, दौलतराव कदम, महबूब सय्यद, गोविंद कदम, माधव निळे, दिगंबर कदम, विश्वंभर मोगरे, प्रकाश कदम, काशिनाथ भंडारवार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येन धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.