17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रदेवगड हापूस आंबा बाजारपेठेत दाखल

देवगड हापूस आंबा बाजारपेठेत दाखल

सावंतवाडी : प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर-वरचीवाडी येथील आंबा बागायतदार नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी आपल्या आंबा बागायतीतील हापूस आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी मार्केटला पाठविल्या आहेत. या पाठविलेल्या देवगड हापूसच्या एक डझनच्या एका पेटीला २ हजार ५०० इतका भाव मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

हवामानात सातत्याने होणा-या बदलामुळे चांगल्या पद्धतीने आंबा पीक घेणे आज शेतक-यांना कठीण बनले आहे. कारण उत्पादनापेक्षा कीटकनाशकांच्या औषध फवारणीसाठी खर्च केला जातो आणि यामध्येच हापूस आंबा पीक घेणे व ते टिकवणे हे खूप कठीण बनत चालले आहे.

अशातच देवगड तालुक्यातील कुणकेश्वर वरचीवाडी येथील नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी आपल्या बागेतील हापूस आंब्याच्या कलमांना श्रावण महिन्यापासून मोहोर येऊ लागला होता.हवामानाच्या बदलामुळे हा मोहोर गळून देखील ब-याच वेळा पडला मात्र आलेला मोहोर टिकवण्यासाठी या दोन बंधूंची धडपड होती यात त्यांना यशही आले त्यांनी आपल्या बागेतील मोहोर टिकावा यासाठी नियोजनबद्ध कीटकनाशकांची फवारणी करत आंबा पिक जपण्याचा प्रयत्न केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR