23.7 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रसहकारी असूनही मला खोट्या केसमध्ये अडकावण्याचा प्रयत्न झाला

सहकारी असूनही मला खोट्या केसमध्ये अडकावण्याचा प्रयत्न झाला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर थेट आरोप योग्य वेळी सगळं उघड करणार

मुंबइ (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील माहाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना विरोधकांनाच नाही तर आपल्यालाही खोट्या प्रकरणात अडकावण्याचा प्रयत्न झाला ही वस्तुस्थिती आहे. योग्य वेळी सर्व बाहेर काढणार आहे, असा गर्भित इशारा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परमबीर सिंह यांच्या आरोपांना आज दुजोरा दिला.

महाविकास आघाडीच्या काळात विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच नव्हे तर विद्यमान मुख्यमंत्री व तत्कालीन नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनाही खोट्या गुन्ह्यात अडकावण्यासाठी आपल्यावर दबाव होता. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार असले तरी त्यांच्या मागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे होते. गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी शरद पवारांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओकवर बैठक झाली होती तर मुंबई बँक प्रकरणात प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सांगलीतल्या विरोधकांवर गुन्हे दाखल करण्यास सांगितल्याचा आरोप करून परमबीर सिंह यांनी खळबळ उडवून दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आज त्यांच्या आरोपांना दुजोरा दिला. परमबीर सिंह बोलतायत ते खरे आहे. विरोधकांना अडकावण्याचे राजकारण आपण एक वेळा समजू शकतो; पण मंत्रिमंडळ आणि पक्षातील सहकारी असूनही आपल्याला अकावण्याचा, खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला ही वस्तुस्थिती आहे.

मातोश्रीसमोरील मुस्लिम आंदोलनात मुख्यमंत्र्यांची माणसं होती या आरोपाचा समाचार घेताना ते म्हणाले, मोघलांच्या घोड्यांना जसे पाण्यात संताजी-धनाजी दिसायचे तसे त्यांना सगळीकडे एकनाथ शिंदे दिसतात. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री होणे त्यांना अजूनही पचवता, स्वीकारता आलेलं नाही. सरकार टिकणार नाही म्हणत होते; पण २ वर्ष होऊन गेली आणि आम्ही आणखी मजबूत झालोय त्यामुळे त्यांना नैराश्य आलंय, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR