21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रदेवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण

देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण

 उखाण्यातून अमृता फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस त्यांच्या गाणी, अल्बम्स यासह रोखठोक भूमिका आणि वक्तव्य यासाठी ओळखल्या जातात. यावेळी मात्र त्यांनी विरोधकांवर अनोख्या पद्धतीने निशाणा साधला आहे, तोही खास उखाण्यामधून. त्यांच्या याच उखाण्याची सर्वत्र चर्चा दिसून आली.

नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने दक्षिण-पश्चिम मंडळाकडून विकासाचे वाण हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. त्यांनी महिलांशी संवाद साधला.

तेव्हा त्यांना उखाणा घेण्याचा आग्रह करण्यात आला. अमृता फडणवीस यांनी एक खास उखाणा घेतला, आणि त्यासह विरोधकांना टोलाही लगावला. ‘‘देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आले विकासाचे वाण.. आपण सर्वांनी स्वीकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करू निर्माण’’ असा खास उखाणा त्यांनी घेतला. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्यांनी त्यांच्या या उखाणा आणि टोल्याला टाळ्या वाजवून दाद दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR