25.3 C
Latur
Monday, January 13, 2025
Homeमहाराष्ट्रधनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून ‘करो या मरो’

धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून ‘करो या मरो’

बीड: प्रतिनिधी
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे वाल्मिक कराडवर मोक्का लावावा अशी मागणी केली जात आहे. या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मस्साजोगमधील ग्रामस्थांकडून सध्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखही सहभागी झाले आहेत.

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आक्रोश मोर्चा काढण्यात आले. त्यातच आज मस्साजोगच्या आंदोलकांनी आक्रमक होत आंदोलन केले. त्यातच आज सकाळपासून संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख गायब झाले होते. त्यांचा मोबाईल स्विच्ड ऑफ होता.

सकाळ धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढल्याची माहिती समोर आली. धनंजय देशमुख यांनी भाऊ संतोष देशमुख याला न्याय मिळावा, यासाठी आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून ‘करो या मरो’ आंदोलन सुरु केले आहे.

‘‘माझ्या भावाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, माझ्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, माझ्या चांगुलपणाचा किती फायदा घेणार. जर माझ्या चांगल्यापणाचा असा किती फायदा करुन घेणार आहात. मी शांतपणे आंदोलन करतोय, मी न्याय मागतोय, असे धनंजय देशमुख म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR