सोलापूर : धनगर समाजाला साहित्याची मोठी गौरवपूर्ण परंपरा आहे. त्यांच्या इतिहासाच्या खुणा अस्मितादर्श आहेत. वस्तुनिष्ठ नवा इतिहास लिहिण्याची गरज आहे त्यासाठी नवे इतिहासकार निर्माण होण्याची आवश्यकता आहे. सत्याची पेरणी संमेलनात होते. सत्याची, समन्वयाची पेरणी आवश्यक आहे. जातिव्यवस्था संपली पाहिजे. केवळ माणूस आणि माणुसकी राहावी. बेरजेचे समाजकारण व्हावे असे सांगतानाच आता सर्वांनीच संविधान संस्कृती जपली पाहिजे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे केले.
श्री संत सद्गुरु बाळूमामा ट्रस्ट बेलाटी आयोजित पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन श्री संत सद्गुरु बाळूमामा मंदिर विजापूर बायपास हायवे बेलाटी येथे होत आहे. भंडारा उधळून आणि दीप प्रज्वलन करून तसेच श्री संत सद्गुरु बाळूमामा यांच्या प्रतिमेचे पूजन करून संमेलन उद्घाटन सोहळा पार पडला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार एड. रामहरी रुपनवर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, संस्थापक प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले, स्वागत अध्यक्ष श्रीराम पाटील, माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य आर. एस. चोपडे, एम. के. फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे,माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य आर. एस. चोपडे, समाजसेविका शोभा पाटील, माजी सभापती विजया पाटील, सांगलीचे नगरसेवक विष्णू माने, हुलजंतीचे आडव्याप्पा पुजारी, माजी स्वागत अध्यक्ष प्राचार्य संजय शिंगाडे, साहित्यिक बापूसाहेब हाटकर, उपाध्यक्ष संभाजीराव सूळ, सिद्धारूढ बेडगनूर, अण्णाप्पा सतुबर, बाळासाहेब कर्णवर – पाटील हनुमंत वगारे, प्रा. कुंडलिक आलदर, शेखर बंगाळे, निमिषा वाघमोडे, मनीषा माने, बिसलसिद्ध काळे, गणेश पुजारी आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.