22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रराजीनामा देऊन उपकार केले का?

राजीनामा देऊन उपकार केले का?

मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल

जालना : १६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन सभेला गेलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी वाच्यता नको असे सांगितल्याने मी अडीच महिने शांत राहिलो, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे. आता यावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया आली आहे. राजीनामा दे नाहीतर डोक्यावर घेऊन फिर, अन्यथा समुद्रात जावे आम्हाला काही देणंघेणं नसल्याचं जरांगे म्हणाले आहेत. सोबतच भुजबळांनी राजीनामा देऊन उपकार केले नाहीत असेही जरांगे म्हणाले.

यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, ‘‘एवढा मोठा मंत्री असून झोपेतून उठल्यासारखं बोलत आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना बदनाम करण्याचे भुजबळ यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. गोरगरीब लोक मेले पाहिजेत असे भुजबळ यांचे विचार असून, मग मराठा असो की ओबीसी असो, ज्यांचे त्यांचे विचार असतात. ओबीसी-मराठा एकत्र डीजे लावून नाचत आहेत. ज्या पक्षात जाणार त्यांना अडचणीत आणण्याची भुजबळ यांची सवय आहे. भुजबळांनी कोणत्या पक्षात जावे आम्हाला काही देणघेणे नाही. राजीनामा दिला तर आम्हाला काय करायचं, राजीनामा द्यावा अन्यथा काही करो आम्हाला काहीच देणंघेणं नाही. राजीनामा दे नाहीतर डोक्यावर घेऊन फिर, राजीनामा देऊन उपकार केले नाहीत. शेरशायरी करणारे भुजबळ दुकान टाकून तीन-तीन रुपये जमा करणार का? असा खोचक टोलाही जरांगे यांनी लगावला.

कुणबी नोंदींमध्ये खाडाखोड नाही
मराठा समाजाच्या सापडत असलेल्या कुणबी नोंदींमध्ये खाडाखोड असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी नगरमधील सभेत केला होता. यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, ‘एवढा मोठा मंत्री असून झोपेतून उठून बोलल्यासारखं बोलत आहे. कुठेही खाडाखोड केलेली नाही. शेवटी शासन आहे, कायदा आहे. यासाठी नियम आहे, अभ्यासक आहे, समिती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारने सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असताना, स्वत:च्याच सरकारवर भुजबळ शंका घेत आहेत. भुजबळ यांना अजित पवार आणि फडणवीसांना बदनाम करायचे आहे. हेच त्यांचे स्वप्न आहे. सरकारवर आरोप करून या दोन लोकांना बदनाम करण्याचे त्यांचे प्रयत्न असून, त्यांची ही सवयच असल्याचे जरांगे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR