39.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeराष्ट्रीयडिझेल ट्रर्क्सना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी

डिझेल ट्रर्क्सना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी

नवी दिल्ली : हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यानंतर दिल्ली-एनसीआरमध्ये वायु प्रदूषण नियंत्रण योजनेच्या फेज-४ अंतर्गत निर्धारित निर्बंध हटवण्यात आले आहेत. यासंदर्भात आदेशही जारी करण्यात आला आहे. दिल्लीची हवेची गुणवत्ता पातळी (एक्यूआय) शनिवारी ‘गंभीर’ पातळीवरून ‘अत्यंत खराब’ पातळीवर आली आहे. यानंतर सरकारने प्रदूषणाबाबतच्या इशाऱ्याची पातळी कमी केली. सरकारने डिझेल ट्रर्क्सना राष्ट्रीय राजधानीत प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे. राष्टीय राजधानीत वाऱ्याच्या वेगामुळे हवेची गुणवत्ता सुधारली आहे.

राजधानीत शुक्रवारी हवेची गुणवत्ता ४०५ वरून दुपारी ४ वाजता ३१७ पर्यंत सुधारली. शेजारच्या गाझियाबादमध्ये शनिवारी हवेची गुणवत्ता २७४, गुरुग्राममध्ये ३४६, ग्रेटर नोएडामध्ये २५८, नोएडामध्ये २८५ आणि फरिदाबादमध्ये ३२८ नोंदवण्यात आली आहे. हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्यानंतर, वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने दिल्लीतील ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (जीआरएपी) अंतर्गत स्टेज-४ निर्बंध हटवले आहेत.

वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, जीआरएपीच्या फेज १ ते फेज ३ अंतर्गत प्रदूषणाविरूद्ध निर्बंध कायम राहतील. चौथ्या टप्प्यातील निर्बंध ५ नोव्हेंबर रोजी लागू करण्यात आले होते. यामध्ये बीएस-४ उत्सर्जन नियमांचे पालन करणाऱ्या सर्व डिझेल चारचाकी वाहनांवर बंदी घालण्यात आली होती. आता ट्रकना दिल्लीत प्रवेश दिला जाणार आहे.

प्रदूषणासाठी वाहनांचे उत्सर्जन जबाबदार
दिल्ली सरकार आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), कानपूर यांच्या संयुक्त प्रकल्पाच्या अलीकडील निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, शुक्रवारी राजधानीतील सुमारे ४५ टक्के वायू प्रदूषणासाठी वाहनांचे उत्सर्जन जबाबदार होते. शनिवारी ते ३८ टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR