17 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeसोलापूरदिलीप माने यांना कॉंग्रेसकडून निवडणूक लढविण्याची कार्यकर्त्यांकडून गळ

दिलीप माने यांना कॉंग्रेसकडून निवडणूक लढविण्याची कार्यकर्त्यांकडून गळ

मंद्रूप – कार्यकत्यांच्या आग्रहानंतर माजी आमदार दिलीप माने यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत, हुरडा पार्टीच्या निमित्ताने तिन्हे येथे एकत्र जमलेल्या कार्यकत्यांनी माने यांनी आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढविण्याचा आग्रह धरला. कार्यकत्यांच्या या आग्रहाला माने यांनी प्रतिसाद दिल्याने तेकॉंग्रेसकडून लढण्याचे संकेत मिळत आहेत.

तिन्हे येथील माने यांच्या फार्म हाऊसवर दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रमुख कार्यकत्यांसाठी हुरडा पार्टी व संवाद मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात अनेक राजकीय खलबते झाली. प्रारंभी पंचायत समितीचे माजी सभापती गुरूसिध्द म्हेत्रे, जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती अशोक देवकते, रमजान नदाफ, अरुण बिराजदार व इतर कार्यकर्त्यांनी दिलीप माने यांचा विजय निश्चित असल्याने त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी दक्षिण सोलापूरमधून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवावी, असे आवाहन केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अप्पाराव कोरे, बाजार समितीचे संचालक वसंत पाटील, चंद्रकांत खुपसंगे, माजी सरपंच अप्पासाहेब पाटील (लवंगी), पिराप्पा म्हेत्रे, चिदानंद कोटगोंडे, बापूराव पाटील, गुरुबसय्या स्वामी, निंबण्णा जंगलगी, राम गायकवाड, रमेश नवले, योगिराज दिंदुरे, सिकंदरताज पाटील, शकील कुडले, सचिन गुंड, बाळासाहेब माने, रज्जाक निंबाळे, हुन्नूरसिध्द शेजाळे, राजकुमार सगरे, नरसप्पा दिंदूरे, रावसाहेब पाटील, श्रीकांत मेलगे-पाटील उपस्थित होते.

कार्यकत्यांच्या आग्रहाचा धागा पकडून माने म्हणाले, आपण सहकार, शिक्षण, समाजकारण, कृषी या क्षेत्रात चांगले काम केले आहे. राजकारणात अनेक पदावर असताना आणि नसतानाही आपण जनतेच्या अडचणी सोडवत आलो आहोत. आजही आपण सर्वांसाठी सतत उपलब्ध असतो. आपण आमदार असताना सोलापूर दक्षिणचा विकास केला होता. मात्र, २०१९ मध्ये आपला राजकीय निर्णय चुकला, आपण सोलापूर शहर मध्यमधून अचानक निवडणूक लढलो, तेथे आपला पराभव झाला, आजवर सर्वानी मला साथ दिलीत, अशीच साथ पुढील काळातही द्यावी. तुमच्या आग्रहाखातर मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबध्द आहोत, अशी ग्वाही माने यांनी दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आप्पासाहेब काळे यांनी केले, आभार गंगाधर बिराजदार यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR