परभणी : ज्ञानसाधना प्रतिष्ठान अंतर्गत रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमध्ये ज्ञानसाधना प्रतिष्ठान मधील सेमी इंग्रजी युनिट, फाउंडेशन युनिट, बळीराजा युनिट, पब्लिक स्कूल युनिट मधील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक युनिटच्या पालख्या व ंिदड्या संस्थेच्या मुख्य मैदानावर एकत्रित झाल्या. यावेळी संस्थेच्या सचिव प्रा. शीतल सोनटक्के व सौ. गंगाबाई (आई) सोनटक्के यांच्या हस्ते विठुरायाच्या प्रतिमेचे पूजन तसेच सर्व पालखीचे पूजन करून विद्यार्थी रुपी वारक-यांच्या ंिदडी ध्वज, पताका, टाळ, मृदंगासह विठुरायाच्या नाम घोषामध्ये संस्थेतील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या गेलेल्या पब्लिक स्कूलच्या ग्राउंडवर नेण्यात आल्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वारकरी भजन, फुगडी, ंिपगा, अभंग, भारुडे, खो-खो यासारख्या कला प्रकाराचे प्रात्यक्षिक दाखवले.
याप्रसंगी संस्थेच्या सचिव शितल सोनटक्के यांनी सर्व विद्यार्थ्यांना कलयुगातील नि:शस्त्र विठुरायाच्या भक्तीचे महत्त्व सांगून आपणही सर्व धर्माला व सर्व संप्रदायाला घेऊन जाणा-या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्याची व सर्वांप्रती समदृष्टी ठेवण्याचा संदेश दिला. यानंतर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हरिपाठ घेऊन विठ्ठलाची आरती संस्था सचिव यांच्या हस्ते करण्यात आली व पसायदानाने ंिदडीची सांगता करण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेतील सर्व समन्वयक, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी अथक परिश्रम घेतले.