पॅरिस : राष्ट्रध्वजाचा अवमान करणा-या एका व्यक्तीला थेट देशातूनच हकालपट्टी करण्यात आली. फ्रान्सचे मंत्री गेराल्ड डर्मैनिन यांनी याची माहिती दिली. एका कार्यक्रमामध्ये इमामने फ्रान्सच्या झेंड्याला राक्षसी झेंडा म्हटले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
इमामने मात्र स्वत:वरील आरोप फेटाळून लावले होते. झेंड्याचा अपमान करण्याचा माझा कसलाही हेतू नव्हता, असा दावा त्याने केला. महजौब हे ट्युनेशियाचे आहेत. ३८ वर्षांपूर्वी ते फ्रान्समध्ये आले. ते फ्रान्सच्या दक्षिणेकडील छोट्या शहरात एका मशिदीचे इमाम म्हणून काम करत होते.
या व्हिडिओमध्ये इमामने राष्ट्रध्वजाला राक्षसी झेंडा म्हणत असल्याचे ऐकायला मिळत आहे. ते व्हिडिओमध्ये असेही म्हणतात की, अल्लाहसाठी याची किंमत काहीही नाही. मात्र, यानंतर इमामने दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले की, मी काही गुन्हा केला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. झेंड्याविषयी बोलताना जिभ घसरली, असे ते म्हणाले. तथापि, डर्मैनिन यांनी सोशल मीडियावर सांगितले की, महजोब महजौबी यांना देशाबाहेर काढण्यासाठी आदेश जारी करण्यात आला आहे.