23.7 C
Latur
Tuesday, July 2, 2024
Homeराष्ट्रीयघटस्फोटित पती-पत्नी आमने-सामने

घटस्फोटित पती-पत्नी आमने-सामने

बिष्णूपूर : एकाच कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरोधात उभे ठाकणे ही काही नवीन बाब नाही. मात्र पश्चिम बंगालमधील बिष्णूपूर या मतदारसंघात अगोदर प्रेमविवाह केलेले व नंतर राजकीय विचारांमुळे वेगळे झालेले घटस्फोटित पती-पत्नीच आमने-सामने उभे झाले आहेत.

विद्यमान खासदार पती भाजप तर पत्नी तृणमूलकडून लढत असून राजकीय रिंगणात फॅमिली ड्रामाच सुरू असल्याचा अनुभव मतदारांना येत आहे. भाजपने या मतदारसंघातून विद्यमान खासदार सौमित्र खान यांनाच उमेदवारी दिली आहे.

तर तृणमूल काँग्रेसने त्यांच्या पत्नी सुजाता मंडल यांच्यावर विश्वास टाकला आहे. दोघांनीही २०१० मध्ये प्रेमविवाह केला होता. त्यावेळी खान काँग्रेसमध्ये होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR