30.3 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात २२ जानेवारीला साजरी होणार दिवाळी

महाराष्ट्रात २२ जानेवारीला साजरी होणार दिवाळी

मुख्यमंत्र्यांच्या पालिका आयुक्तांना सूचना

मुंबई : अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचे निर्माणकार्य जोरात सुरू आहे. २२ जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर २२ जानेवारीला राज्यात दिवाळी साजरी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

२२ जानेवारीला राम मंदिर सोहळा पार पडणार आहे. मुंबईत देखील आपण दिवाळी साजरी करावी, मंदिर आणि महत्त्वाच्या इमारतींना विद्युत रोषणाई करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिल्या आहेत. मुंबईतील १० ठिकाणी वेगवेगळ्या आमदारांच्या नेतृत्वात सुरू होत असलेल्या डीप क्लीन ड्राईव्ह उपक्रमात मुख्यमंत्री व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते, या कार्यक्रमात त्यांनी या सूचना दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या सूचना
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईला स्वच्छ करताना प्रदूषण रोखण्यासाठी देखील काम करायचे आहे. मोठ्या प्रमाणात झाडे लावली पाहिजेत. ज्या ठिकाणी काम सुरू असल्याने झाडे कापली जातात त्याबदल्यात इतर ठिकाणी झाडे लावली गेली. शिवडी न्हावा शेवा हा प्रकल्प करताना एकही फ्लेमिंग आपल्याकडून जाणार नाही, याची काळजी आम्ही घेतली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR