30.6 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeसोलापूर'मार्ड'चे डॉक्टर मागण्यांवर ठाम, आंदोलन सुरूच

‘मार्ड’चे डॉक्टर मागण्यांवर ठाम, आंदोलन सुरूच

सोलापूर : निवासी डॉक्टरांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करावी, शिवाय मिळणारे मानधन वेळेवर द्यावे, याची लेखी हमी मिळेपर्यंत आंदोलन सुरू असणार असल्याची भूमिका निवासी डॉक्टरांनी व्यक्त केली. दरम्यान, निवासी डॉक्टर हे शासकीय रुग्णालयातील बी ब्लॉकच्या समोर एकत्र आले. त्यांनी हातात समान काम समान वेतन, डॉक्टर हे बेहार, गव्हर्मेंट तेरा ये कमाल असे विविध बोर्ड हातात घेऊन डॉक्टर आंदोलन करताना पहायला मिळाले.

दरम्यान, आरोग्य सेवेवर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी आढावा घेतला. त्यांनी सकाळी सी ब्लॉकमधील जवळपास सगळ्या ओपीडीमध्ये राऊंड घेऊन रुग्णांची विचारपूस केली. निवासी डॉक्टरांना दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार येथे एक लाखापेक्षा जास्त मानधन आहे.त्याप्रमाणे राज्यातील निवासी डॉक्टरांना एक लाख रुपये मानधन मिळावे. ही डॉक्टरांची प्रमुख मागणी आहे. यासाठी निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू आहे. सर्व निवासी डॉक्टरांनी बी ब्लॉकसमोर एकत्र येत आपल्या मागण्या मांडल्या.

आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व निवासी डॉक्टर आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. कालच्या झालेल्या मिटिंगमध्ये पुन्हा एकदा आश्वासन देण्यात आले. पण लिखित स्वरूपात काहीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आम्ही संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संपामध्ये राज्यातील सर्व निवासी डॉक्टर सहभागी आहेत. असे मार्ड सोलापूर अध्यक्ष डॉ. प्रवीण मनवर यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR