21.3 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeमहाराष्ट्रनिवडणूक आयोग पाच वर्ष झोपा काढते का?

निवडणूक आयोग पाच वर्ष झोपा काढते का?

मुंबई : शाळांमधील शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवण्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगालाच धारेवर धरले. निवडणूक आयोग पाच वर्ष झोपा काढत असते का? शिक्षकांऐवजी आयोगावरच शिस्तभंगाची कारवाई करायला हवी, असे राज ठाकरे म्हणाले. शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून राज ठाकरेंची भेट घेण्यात आली. यावेळी शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी कुठेही निवडणूक कार्यक्रमाला रुजू होऊ नये, मुलांकडे लक्ष द्यावं, कोण काय कारवाई करतं, त्याकडे मी पाहतो, असं राज म्हणाले.

दरम्यान, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवणा-या शिक्षकांना निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ४ हजार १३६ शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवण्यात आले आहे. एवढे काय काम असते? निवडणूक आयोग पाच वर्ष काय करत असते?

दर वर्षी निवडणूक आल्यावर घाई गडबडीत का कामे करुन घेतली जातात? हजर न होणा-या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. उलट निवडणूक आयोगावर पाच वर्ष काही काम न केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असे राज ठाकरे म्हणाले.
निवडणुका येणार हे माहित नव्हते का, अचानक निवडणुका आल्या का? तुमची यंत्रणा तयार नको का, दरवेळी काहीतरी काढून वाद निर्माण करायचा, या सगळ्यात शाळेतील लहान मुलांचा काय दोष? शिक्षक काय निवडणुकांच्या कामासाठी आले आहेत का?

शिक्षकांचे काम हे ज्ञानदानाचे आहे. शिक्षकांना विनंती आहे, त्यांनी निवडणुकीच्या कामासाठी कुठेही रुजू होऊ नका, मुलांकडे लक्ष द्या, कोण काय कारवाई करते, त्याकडे मी पाहतो. शिक्षकांना कामाला लावण्यापेक्षा नवीन लोक तयार करावे, त्यांना प्रशिक्षण द्यावं, असंही राज ठाकरेंनी सुचवले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR