21.5 C
Latur
Saturday, February 24, 2024
Homeसोलापूरवाढदिवसानिमित्त गोशाळेस अकरा हजाराची देणगी

वाढदिवसानिमित्त गोशाळेस अकरा हजाराची देणगी

करमाळा : प्रतिनिधी
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे चिरंजीव अमरनाथ चिवटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अकरा हजार रुपयांचा धनादेश गोशाळेचे अध्यक्ष श्रेणिक शेठ खाटेर यांच्या कडे देण्यात आला. श्रेणिक शेठ खाटेर यांच्या माध्यमातून करमाळा शरद गोशाळा चालवली जात असून यात जवळपास 200 गाई आहेत.

कापण्यासाठी नेलेल्या गाया पकडून या गोशाळेत सांभाळले जातात. या गाईंच्या चाऱ्यासाठी वाढदिवसानिमित्त अकरा हजारांचे धने देश अमरनाथ चिवटे यांनी दिला. हिंदू धर्मात गो सेवेला प्रचंड महत्व आहे यामुळे प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा आपल्या घरातील शुभ कार्याच्या निमित्ताने या गोशाळेला आर्थिक मदत करून मुक्या जनावरांच्या चाऱ्यासाठी मदत करावी असे आवाहन श्रेणिक शेठ खाटेर यांनी केले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR