मुंबई : शिवतीर्थ येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) युवा नेते अमित ठाकरे यांचे औक्षण करण्यात आले. त्यांच्या अभिनंदनासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या वेळी मनसेच्या इतर उमेदवारांचे देखील औक्षण करण्यात आले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी खास भूमिका बजावली.
त्या औक्षणाच्या वेळी बोलताना म्हणाल्या, ‘ओवाळणीत एक रुपयाही नको, आता आमदारकी पाहिजे!’ त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ‘आमदारकी पाहिजे’ या विधानातून मनसेच्या कार्यकर्त्यांचा जोश वाढलेला दिसत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेला किती यश मिळेल, हे येणा-या काळातच ठरेल, पण सध्याच्या घडीला मनसेच्या उमेदवारांकडे मोठ्या अपेक्षांनी पाहिले जात आहे.