22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रमीपण मुख्यमंत्री व्हावे असे वाटत नाही का?

मीपण मुख्यमंत्री व्हावे असे वाटत नाही का?

विनोद तावडेंची मिश्कील टिप्पणी

नागपूर : एकेकाळी महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील भाजपचा आघाडीचा चेहरा म्हणून ख्याती असलेले भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विनोद तावडे यांनी रविवारी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रात ओबीसी मुख्यमंत्री पाहायला मिळेल का? तसे झाल्यास पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपद मिळेल का?, असा प्रश्न तावडे यांना विचारण्यात आला. त्यावर विनोद तावडे यांनी मिश्कील शैलीत उत्तर दिले.

त्यांनी पत्रकारांना, ‘तुम्हाला मी मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न विचारावासा का वाटत नाही’, असा प्रतिसवाल केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र, विनोद तावडे यांच्या मुख्यमंत्रिपदाविषयीच्या टिप्पणीमुळे ते पुन्हा महाराष्ट्रात परतणार का? या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे.

राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपाने धक्कातंत्र वापरले आहे. जुन्या चेह-यांना डावलून नव्यांना मुख्यमंत्रिपदी संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातही हाच प्रयोग भाजपा करणार का? आगामी निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत आला तर पंकजा मुंडे यांना तुम्ही मुख्यमंत्री कराल का, असे विनोद तावडे यांना विचारण्यात आले. त्यावर तावडे यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, हे माझ्याच हातात आहे. पण, मी मुख्यमंत्री होईल का? असा प्रश्न तुम्हाला का पडत नाही? पंकजा मुंडे यांची काळजी पडली का? केव्हातरी माझीही काळजी करा, असे विनोद तावडे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांनाच काहीसा आश्चर्याचा धक्का बसला.

२०१४ च्या निवडणुकीपर्यंत विनोद तावडे हे महाराष्ट्र भाजपचा प्रमुख चेहरा होते. साहजिकच भाजपची सत्ता आल्यास भावी मुख्यमंत्री म्हणून नाव घेतल्या जाणा-यांच्या पंक्तीत विनोद तावडे यांचा क्रमांक वरचा होता. नंतरच्या काळात विनोद तावडे यांना विधानसभा निवडणुकीचे तिकिट नाकारण्यात आले. या सगळ्यामुळे तावडे महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होऊन दिल्लीत गेले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR